१४ तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यामुळे त्याआधीच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा शपथविधी होऊ शकतो. त्याची तयारीसुरू झाली असल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली असून आत ,मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आत महायुती सरकार मध्ये चर्चेना उधाण आले असून महायुती सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्रिपद दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आता नवी माहिती समोर आली असून दिल्लीत नव्या संभाव्य मंत्र्यांची यादी पाठवण्यात आली आहे. तिथे शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्या आमदारांचा मंत्रीपदाचा मार्ग मोकळा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्वच्छ चेहऱ्यांचा समावेश करायचा आहे. मागील सरकारमध्ये भाजपचे १० आणि शिवसेनेचे ९ आणि राष्ट्रवादीचे ९ मंत्री होते. सूत्रांच्या माहितीनुसार, फडणवीस काही मंत्र्यांना पुन्हा संधी देऊ शकतात.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण २८ सदस्य होते. त्यामुळे यंदाही त्या सगळ्यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याची आशा आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या पाच नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास फडणवीस तयार नसल्याचं बोललं जातंय. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे हे नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतात. अशी चर्चा आहे. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून ही काही आमदारांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यास देखील फडणवीस तयार नाहीत. अशीही माहिती आहे.