अजित पवारांची राज्यपाल स्नेहभोजनाला देखील गैरहजरी ! नेमकं चाललंय काय ?
अजित पवारांची राज्यपाल स्नेहभोजनाला देखील गैरहजरी ! नेमकं चाललंय काय ?
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून रविवारी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. परंतु  अद्यापही खाते वाटप झाले नसल्यामुळे राजकीय वर्तुळात निरनिराळ्या चर्चना उधाण आले आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  दोन दिवसापासून सभागृहात देखील उपस्थित नाहीत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्र विधीमंडळाच हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झालेल्या भाजप महायुतीच्या सर्व नवनियुक्त मंत्री आणि आमदारांना आज राज्यपालांकडून स्नेहभोजनासाठी निमंत्रीत करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह भाजप महायुतीच्या आमदारांनी राजभवनात हजेरी लावली होती. मात्र याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गैरहजेरी हा मात्र चर्चेचा विषय ठरत आहे.

अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीचे अनेक आमदारांनी ही या कार्यक्रमाकडे पाठच फिरवल्याच दिसत आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून अजित पवार एकदाही विधानभवनात फिरकले नसल्यानं पवारांच नेमकं चाल्लय तरी काय याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत भाजप पक्ष श्रेष्ठींच्या भेटीला गेले आहेत. महायुतीमधील खाते वाटपाच्या मुद्यावर अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोडून दिल्ली गाठली असल्याची चर्चा आहे. मागील सरकारच्या काळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेली खात्यांचा तिढा असल्याचे म्हटले जात आहे. अजित पवारांनी अर्थ आणि महिला-बाल विकास खाते पुन्हा मिळावे यासाठी दिल्लीत धाव घेतली असल्याचे म्हटले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी अद्याप खाते वाटप झाले नाही.

इतर बातम्या
Join Whatsapp Group