बीडचा केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला या हत्याप्रकरणावर सर्वच स्तरांतून विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत, दरम्यान संभाजीराजे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावर मोठा खुलासा केला आहे. संभाजीराजे यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत इथल्या आमदाराना मंत्री करू नका’ अशी मागणीही संभाजी राजेंनी केली. पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजेंनी सरकारला धारेवर धरलं.
‘संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणातला मुख्य सूत्रधार शोधला पाहिजे. ज्याप्रकारे देशमुख यांची हत्या केली गेले ते अतिशय निर्घृणपणे केली आहे. बोटं कापलेत, लाईटरने डोळे जाळले आंबेडकर शाहू फुले यांचा हा महाराष्ट्र आहे का? अजित दादांना माझी विनंती आहे हे तुमच्या पक्षातील लोक आहेत. माझी अजितदादांना विनंती तुमच्या पक्षाचे लोक आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमच्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री करू नका. तुम्ही नेहमी शाहू महाराजांचं नाव घेता. इथल्या आमदाराला मंत्रीपद देऊ नये असे म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाला साधला.
‘महाराष्ट्रात बिहारच्या मार्गावर चाललाय का ? असा प्रश्न आमच्या मनात निर्माण होतो. तसंच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे न पाठवता एसआयटी स्थापन करुन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली. तसेच, ‘घटना घडल्यानंतर 36 फोन पोलिसांना केले होते. मात्र पोलीस तीन तास मजा बघत होते. आता या प्रकरणी एकाला निलंबन केलं आहे आणि एकाला सक्तीचा राजावर पाठवलं आहे. या प्रकरणात पीआयला सह आरोपी करा, अशी मागणीही त्यांनी केली.