भटक्या कुत्रा आणि मांजर चावल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्याण पश्चिमेतील शुभम चौधरी या तरुणाचा भटक्या कुत्रा आणि मांजर चावल्याने मृत्यू झाला आहे. शुभम कल्याणच्या गोल्डन पार्क इमारतीत राहत होता.
या विषयी अधिक माहिती अशी की, दोनच महिन्यापूर्वी रात्रीचं जेवण आटोपून इमारतीच्या खाली फेरफटका मारण्यासाठी एक तरुण खाली उतरला होता. इमारतीच्या खाली बाजूलाच भटक्या कुत्र्यांचा कळप होता. त्यापैकी एका भटक्या कुत्र्याने तरुणाचा चावा घेतला. हा चावा किरकोळ असल्याचे समजून त्याने उपचार घेतले नाहीत. त्यानंतर गेल्याच आठवड्यात त्याचा एका मांजरीने चावा घेतला. तो चावाही किरकोळ असल्याचं समजून त्याने उपचार केले नाहीत.
या दरम्यान त्याची १० डिसेंबरला प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला कल्याणमधील खाजगी रुग्णालय, कळवा आणि शेवटी कस्तूरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच १२ डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, याबाबत शुभमच्या वडिलांनी खंत व्यक्त करत माझ्या मुलाच्या कृतीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला आहे. तर याबाबत कल्याण महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात 18700 जणांना कुत्रा चावला असल्याची माहिती दिली. तसेच एका संस्थेमार्फत कल्याण डोंबिवली परिसरातील भटक्या कुत्र्यांचे 900 रुपये देऊन त्यांचे वॅक्सिंग होत असून जी घटना घडली आहे त्या संदर्भात चौकशी करणार असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल