खळबळजनक !  माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या, बुलेटवरून जाताना अज्ञाताकडून हल्ला
खळबळजनक ! माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या, बुलेटवरून जाताना अज्ञाताकडून हल्ला
img
दैनिक भ्रमर
राज्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून, एखाद्या गोष्टीचा राग मनात ठेऊन हत्या, मारामारी, जीवघेणा हल्ला अशा अनेक घटना घडताना दिसत आहेत. अशीच एक खळबळजनक घटना घडली आहे .सांगली जिल्ह्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. खानापूर तालुक्यातील घानवड येथे माजी उपसरपंचाचा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. बापूराव देवप्पा चव्हाण असं हत्या झालेल्या माजी उपसरपंचाचं नाव आहे. . गार्डी नेवरी रस्त्यावर दिवसा ढवळ्या बापूराव चव्हाण यांचा गळा चिरून हत्या  करण्यात आली आहे. बापूराव देवाप्पा चव्हाण हे घानवड गावचे माजी उपसरपंच आहेत.

बापूराव चव्हाण यांचं विट्यामध्ये सोनारसिद्ध ज्वेलर्स नावाने ज्वेलरीचं दुकान आहे. दुपारी बुलेट गाडीवरून नेवरी रस्त्यावरील पोल्ट्री शेडकडे निघाले असता त्यांच्यावर अज्ञात इसमाने हल्ला केला. ही घटना रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी पाहिली आणि विटा पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group