आईसोबत शेतात गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं ?
आईसोबत शेतात गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं ?
img
दैनिक भ्रमर
आईसोबत शेतात गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला  अत्यंत दुर्दैवी घटना समोर आलाय आहे.  एक आठ वर्षाचा आणि दुसरा चार वर्षांचा मुलगा होता.  दोन्ही भाऊ खेळत असताना विहिरीत पडले आणि बुडून त्यांचा करुण अंत झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आडूळ गावातील आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  प्रणव कृष्णा फणसे (४ वर्ष) आणि जय कृष्णा फणसे (८ वर्ष) असं मृत्यू झालेल्या दोन सख्या भावांची नावं आहेत. शेतामध्ये हे दोघे भाऊ खेळत होते. खेळता खेळता ते विहिरीत पडले, त्यानंतर आरडाओरडा सुरू झाला. विहिरीला पाणी जास्त असल्यामुळे अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचवून दोन्ही भावांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.


इतर बातम्या
Join Whatsapp Group