कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. आहे कारण कॅन्सरवरील उपचारसाठीच्या औषधांच्या किमती कमी करण्यात आली आहेत. कॅन्सरच्या रुग्णांचा औषधांवरील खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा मंत्र्यांनी केला. औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी या अधिसूचनांचे पालन करून औषधांच्या किंमती कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राष्ट्रीय औषधी मूल्य निश्चित प्राधिकरणाने याविषयीच्या बदलाची सूचना दिली आहे.
याशिवाय एनपीपीएने एक सूचना जारी केली आहे. त्यात कॅन्सर औषधी निर्मिती कंपन्यांना दरात कपात करण्याची सूचना देण्यात आली आहे. जीएसटी दर आणि सीमा शुल्कात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याचा फायदा कॅन्सर रुग्णांना मिळणार आहे. एस्ट्राजेनेका फार्मा इंडिया लिमिटेडने त्यांच्या काही औषधांच्या किंमतीत कपात केल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयानुसार, एस्ट्राजेनेकाने याविषयीचे एक पत्र दिले आहे. त्यात बीसीडी शून्य झाल्याने नवीन बाजारातील स्टॉकची विक्री कमी किंमतीत करण्यात येणार आहे. या निर्णयानंतर या औषधांच्या किंमती अधिक स्वस्त होतील.