मोठी बातमी ! आरबीआय'च्या 'गव्हर्नर'पदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती, केंद्र सरकारची घोषणा
मोठी बातमी ! आरबीआय'च्या 'गव्हर्नर'पदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती, केंद्र सरकारची घोषणा
img
दैनिक भ्रमर
केंद्र सरकारकडून नव्या  आरबीआय गव्हर्नरची घोषणा काण्यात आली आहे. संजय मल्होत्रा हे आरबीआयचे  नवे गव्हर्नर असणार आहे. ​​यांची आरबीआयचे पुढील गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मल्होत्रा यांची ही नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. आरबीयचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ मंगळवारी (ता. 10 डिसेंबर) संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा करण्यात आली आहे.

महसूल सचिव या पदावर मल्होत्रा हे सध्या कार्यरत असून 1990 बॅचच्या राजस्थान केडरचे आयएएस आहेत. केंद्र सरकारने आपल्या तिसर्‍या टर्ममध्ये आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे. ते आगामी तीन वर्षांसाठी पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. त्यांनी कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे. मल्होत्रा यांनी यूएसए येथून प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीत पब्लिक पॉलिसी या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.

याशिवाय त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. संजय मल्होत्रा ​​यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात सचिव  आहेत. त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते. संजय मल्होत्रा  यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group