राष्ट्रवादीच्या मंत्र्याची संभाव्य यादी; दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब, वाचा सविस्तर
राष्ट्रवादीच्या मंत्र्याची संभाव्य यादी; दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब, वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळविला असून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. याचग पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे

राजधानी दिल्लीतील प्रफुल पटेल यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सुरू आहे.  मंत्रिमंडळ शपथ विधी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका निश्चित करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होत असल्याची सूत्रांची माहिती आहेया बैठकीला पक्षाध्यक्ष अजित पवार कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , पार्थ पवार देखील उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या संभाव्य नावावर चर्चा करण्यात आली आहे. त्या मंत्र्यांमध्ये कोण कोण असावं यावर बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्याची संभाव्य यादी

  • अजित पवार

  • आदिती तटकरे

  • छगन भुजबळ

  • दत्ता भरणे

  • धनंजय मुंडे

  • अनिल भाईदास पाटील

  • नरहरी झिरवळ

  • संजय बनसोडे

  • इंद्रनिल नाईक

  • संग्राम जगताप

  • सुनिल शेळके
इतर बातम्या
Join Whatsapp Group