भाजप 'ही' खाती भाजप स्वत:कडे ठेवणार! शिंदेंची कोंडी?
भाजप 'ही' खाती भाजप स्वत:कडे ठेवणार! शिंदेंची कोंडी?
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्यात सध्या एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे निवडून आलेल्या आमदारांचे डोळे मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याकडे लागले आहेत. महायुती सरकारने मंत्रिमंडळासाठी  21-12-10 असा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती आहे. त्यानुसार सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या भाजपला 21, त्यापाठोपाठ शिंदे गटाला 12 आणि अजितदादा गटाला 10 मंत्रीपदे मिळणार आहेत. 

मात्र, या सगळ्यात राज्यात वचक ठेवण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती कोणाकडे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

खातेवाटपामुळे महायुतीच्या सत्ता स्थापनेला मुहूर्त मिळत नसल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्रि‍पदाचा घोळ संपल्यानंतर आता गृहमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु झाल्याचं दिसतेय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून गृह मंत्रालयावर दावा ठोकण्यात आलाय. पण भाजपकडून शिंदेंची मागणी फेटाळून लावली आहे. त्याशिवाय शिंदेंकडे असणारे नगरविकास मंत्रालय भाजप आपल्याकडे ठेवणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. 

भाजप मुख्यमंत्रिपदासोबत गृह तसेच नगरविकास मंत्रालय आपल्याकडेच ठेवणार आहे. शिवसेनाला उपमुख्यमंत्रिपदासोबत सार्वजनिक बांधकाम तसेच महसूल मंत्रालय देणार असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्रिपदासोबत अर्थ खातं दिलं जाणार आहे.

दरम्यान सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटतानाच मंत्रिपदावरून सध्या रस्सीखेच सुरू झालाय. मुख्यमंत्रिपद सोडताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गृह विभागाची प्रामुख्याने मागणी करण्यात आली. मात्र सर्वाधिक महत्त्वाचं खातं असल्याने हे खातं भाजपने सोडण्यास थेट नकार दिला आहे. परंतु राज्य गृहमंत्री हे खाते मात्र एकनाथ शिंदेंना सोडण्यात येईल, अशी माहिती आता समोर आली आहे.  

एकनाथ शिंदेंची भाजपकडून कोंडी? 

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात ठेवताच भाजपने नगर विकास विभाग देखील आपल्याकडे घेण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असताना नगरविकास खातं स्वतःकडे ठेवण्यात आलं होतं, मात्र यावेळेस हे खातं भाजप आपल्याकडे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपकडे असणारे दोन महत्त्वाचे खाते ती म्हणजे सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खातं हे मात्र उपमुख्यमंत्रीपदासोबत एकनाथ शिंदे दिले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासोबत अर्थ खातं दिल जाणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group