अखेर ठरलं ! मुख्यमंत्री कोण ? कोणाला किती मंत्रिपदं ? वाचा सविस्तर
अखेर ठरलं ! मुख्यमंत्री कोण ? कोणाला किती मंत्रिपदं ? वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
विधानसभेत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळविला असून महाविकास आघाडीला मोठा पराभव  सहन  करावा  लागला आहे. दरम्यान आता सत्तावाटपाच्या हालचालींना वेग आला असून अशातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. महायुतीच्या सत्तावाटपाचं सूत्र ठरल्याचं बोललं जातंय. विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला राज्याच्या सत्तेत मोठा वाटा मिळणार आहे.त्या खालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीतील प्रमुख तीन घटक पक्षांमध्ये सत्ता वाटप होणार आहे.

भाजपनं राज्यात 132 जागा जिंकल्या आहेत. त्या खालोखाल शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं 57 जागा मिळवल्या आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आले आहेत. हे संख्याबळ लक्षात घेऊन सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आलं आहे. दरम्यान , भाजपच्या वाट्याला 25 मंत्रिपदं, शिंदेंच्या शिवसेनेला 10 मंत्रिपदं तर तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 7 मंत्रिपदं मिळणार असल्याचं बोललं जातंय. एका वृत्तवाहिनीला सूत्रांनी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या सत्तेत सर्वाधिक वाटा भाजपला मिळणार आहे. त्याखालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहेत. नुकतेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत सत्तावाटपाचं सूत्र ठरल्याचं बोललं जातंय. गेल्या वेळी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समसमान सत्ता वाटप झालं होतं. प्रत्येक पक्षाला 9 मंत्रिपदं देण्यात आली होती. पण आता सत्ता वाटपाचं सूत्र बदललं आहे.त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group