मोठी अपडेट ;  खाती ठरली ?  शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांना कोणती जबाबदारी ?
मोठी अपडेट ; खाती ठरली ? शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांना कोणती जबाबदारी ?
img
दैनिक भ्रमर
राज्याच्या सत्तास्थापनेच्या पार्श्ववभूमीवर  महायुती सरकारमधून मोठी अपडेट समोर अली आहे.  एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणते खाते असतील हे ठरले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं जाणार आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं जाणार आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालय राहणार आहे

तसेच, भाजपचा 48 तासात नेता निवडीचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपचे दोन निरीक्षक नेता निवडीसाठी महाराष्ट्रात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या नेता निवडीची बैठक ही 29 तारखेला होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

दरम्यान , राज्यात पुढच्या 48 तासात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान , देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला भाजपच्या सर्व आमदारांचा पाठिंबा आहे. .
इतर बातम्या
Join Whatsapp Group