उदयनराजेंची घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट, केली ''ही''  मागणी
उदयनराजेंची घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट, केली ''ही'' मागणी
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुतीने घवघवीत यश संपादन केले असून सत्ता स्थापनेच्या  हालचालींना वेग आला आहे. दरम्यान  सातारा जिल्ह्यातील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांना घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी महाराष्ट्र भाजपचे  देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महायुतीच्या देदीप्यमान विजयाबद्दल अभिनंदन करून साताऱ्याचा मानबिंदू असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सत्कार त्यांचा केला.

दरम्यान ,  फडणवीस यांच्या भेटीत उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंना मंत्री करा, अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केल्याचे कळते. शरद पवार यांनीआजपर्यंत पायात पाय घालण्याचे आणि पाडापाडीची कामे केली. त्याची त्यांना पोचपावती मिळाली आहे. आत्ताचा निकाल हा त्याचाच परिणाम आहे. राज्यात शरद पवार यांचा करिश्मा कधीच नव्हता, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती.

दरम्यान यावेळी सातारा-जावळीचे आमदार, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, कराड-दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड-उत्तरचे मनोज घोरपडे, सुनील काटकर, काका धुमाळ, राजू भोसले, अविनाश कदम सोबत होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group