महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीवर बाजी मारली आहे. तर दुसरीकडे महाविकस आघाडीसाठी मात्र हा निकाल धक्क्कादायक ठरला आहे. दरम्यान राज्यातील घडामोडींना वेग आला असून अनेक घडामोडी घडत आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातुन मोही बातमी समोर येत आहे. बुलडाणा जिल्हयातील मोताळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून आरोपींच्या हल्ल्यात सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्ण्यालयात भरती करण्यात आले आहे असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे.पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून हल्ला करणाऱ्यांचा पोलीस घेत आहेत.
या प्रकरणाविषयी अधिक माहिती अशी की , तालखेड फाट्याजवळ हा हल्ला झाला असून हल्लेखोर तोंडावर रूमाल बांधून होते. दोन वेगवेगळ्या बाईकवरून आलेल्या चार जणांनी रॉडने कोल्हे यांच्यावर हल्ला चढविला. यात सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्ण्यालयात भरती करण्यात आले आहे.
दरम्यान , अॅड. जयश्रीताई शेळके रुग्णालयात दाखल झाल्या असून हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे ज्यांनी प्राणपणाने काम केले अशा लोकांवर प्राणघातक हल्ले केले जात असून निकाल लागल्याच्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तलवारी घेऊन चाल करणे, ज्यांच्या घरावर बॅनर होते त्यांना मारहाण करणे तसेच धमकावण्याचे प्रकार सुरु असल्याचे त्यांनी म्हटले.तसेच , बुलढाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू असून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.