एका वधूने लग्नाच्या पहिल्याच रात्री असे काही केले कि त्यामुळे न त्याचे कुटुंबीयही हादरले. उत्तराखंडमधील सोनीपतमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीची तयारी सुरू होती. पण वधूने असे काही कृत्य केले की त्याबाबत वराने कधी विचार देखील केला नसेल. दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता वराने लग्नाच्या पहिल्या रात्री घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. घडलेला प्रकार ऐकून सर्वजण हादरून गेले.
या घटने विषयी मनजितने म्हणजेच नवरदेवाने सांगितले की, लग्नाच्या पहिल्या रात्री सुमारे 11 वाजता वधू दोन कप चहा घेऊन रुममध्ये आली. तिने मला एक कप दिला. मी चहा पिऊ लागलो. मग वधू मी पाणी पिऊन येते असं सांगून रूमच्या बाहेर गेली. इकडे चहा प्यायल्यावर मला खूप झोप आली आणि माझी शुद्ध हरपली. माझ्या आईने देखील चहा घेतला होता. त्यामुळे ती बेशुद्धावस्थेत होती. कुटुंबातील लोक त्यांना घेऊन रुग्णालयात पोहोचले. तिथं त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
मनजितने सांगितलं की, लग्नाच्या पहिल्या रात्री वधू पल्लवी माझ्याजवळ आली नाही. मला काहीच समजले नाही. चहा प्यायल्यानंतर माझी शुद्ध हरपली. दुसऱ्या दिवशी सकाळी तब्येत बिघडल्याने कुटुंबियांनी रुग्णालयात नेले. मी रुग्णालयातून घरी परतलो तेव्हा वधू पल्लवी घरातून निघून गेलेली होती. आमच्या घरातील सर्व दागिने, रोकड आणि विवाहाचे साहित्य गायब आहे. पल्लवीने चहात काहीतरी अंमली पदार्थ मिसळल्याने मी आणि माझी आई बेशुद्ध पडलो. पोलिसांनी सांगितलं की, याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पल्लवी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या वधू आणि तिच्या वडिलांचा फोन स्विच ऑफ लागत आहे. पीडितांनी या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करण्याची मागणी केली आहे.दरम्यान , या प्रकरणी माहिती देताना खरखौदा पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर सौरभ कुमार यांनी सांगितलं की, उत्तराखंडमधील हरिद्वार येथील पल्लवी नावाच्या तरुणीशी विवाह झाला होता. 15 नोव्हेंबरला नववधूने मनजित आणि त्याच्या आईच्या चहात अंमली पदार्थ मिसळला. सकाळी उठल्यावर दोघांची प्रकृती बिघडलेली होती. मनजित ची पत्नी पल्लवी घरातून गायब झाली होती, अशी तक्रार आम्हाला मिळाली. विवाहात मिळालेले दागिने आणि दोन लाख रुपयांची रक्कम घेऊन ती फरार झाल्याचा आरोप आहे. तक्रारीच्या आधारे पल्लवीवर गुन्हा दाखल केला आहे.