आईवडील आपल्या पाल्यासाठी आपल्यानंतर दुसर कोणावर विश्वास ठेवत असतील तर ते असतात शिक्षक. मूळ एकदा शाळेत गेले की आई वडील निश्चिन्त असतात. कारण त्यांना विश्वास असतो कि शाळेत आपले मुलं सुरक्षित असतील. पण या विश्वासाला तडा बसेल अशी घटना चंद्रपूरमध्यचे जिल्हापरिषदेच्या शाळेमध्ये घडली आहे .
शाळेच्या शिक्षिकेने सातवीच्या वर्गातील 17 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघकीस आला आहे. शिक्षिकेने जबर मार दिल्यानंतर दोन विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना जवळच्या सावली ग्रामीण रुग्णालयातही भरती करण्यात आल्याची माहिती आहे. उज्वला पाटील असे या शिक्षिकेचे नाव असून त्या शाळेमध्ये विषय शिक्षिका म्हणून काम करत आहेत. या प्रकारामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली असून सर्वांनी यावर रोष व्यक्त केला आहे. चंद्रपुरातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये हा संबंधिकत धक्कादायक प्रकार घडला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की , उज्वला पाटील या शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याने मुलींना त्रास झाला असून दोषी शिक्षिकेवर कारवाई करण्याची पालकांची मागणी आहे. माझ्या पिण्याच्या पाण्यात काहीतरी मिसळवले असा आरोप करत या शिक्षेकेने विद्यार्थ्यांना बेदम मारलं आहे. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची बाटलीमध्ये विद्यार्थींनीनी काहीतरी मिसळ्याचा आरोप शिक्षिकेंनी केला. यानंतर त्यांनी वर्गातील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. यामुळे दोन विद्यार्थींनीची तब्येत बिघडली. धनश्री हरिदास दहेलकर आणि लावण्या कुमदेव चौधरी या दोन विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर चंद्रपूर मधीलच सावली ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या मुलींच्या पालकांची निष्ठूर शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी आहे.