अल्पवयीन मुलाकडून ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’चा थरार  !  तीन वाहनांना धडक, रिक्षा चालकाचा मृत्यू
अल्पवयीन मुलाकडून ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’चा थरार ! तीन वाहनांना धडक, रिक्षा चालकाचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर
अल्पवयीन मुलाकडून  ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलाने स्कॉर्पियो कारने तीन वाहनांना धडक दिली. त्यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. दोन जण जखमी झाले आहे. अल्पवयीन मुलगा लष्करातील सैनिकाचा आहे. यापूर्वीही अल्पवयीन मुलाकसुन मद्यपान करून मोठा अपघात झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. 

आता पुन्हा एकदा पुणे नाशिक महामार्गावर अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने स्कॉर्पियो कार चालवत तीन वाहनांना धकड दिली. त्यात रिक्षा चालक अमोद कांबळे (वय 27) यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती देताना पोलीस निरीक्षक पंकज महाजन यांनी सांगितले की, अल्पवयीन चालक 17 वर्ष 10 महिन्यांचा आहे. तो पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याचे वडील भारतील लष्करात सैनिक आहे. त्या मुलाने मद्यपान केल्यानंतर मित्राची एसयुव्ही कार भोसरीवरुन नाशिक फाटापर्यंत वेगाने नेली. त्यानंतर त्या गाडीवरील त्याचे नियंत्रण गेले. त्याने तीन वाहनांना धडक दिली आणि एक डिव्हाडरला ठोकली.
या अपघातात रिक्षा चालक कांबळेचा मृत्यू झाला तर स्कूटर आणि मोटार सायकलवर असणाऱ्या दोघे गंभीर जखमी झाले.

दरम्यान , अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 125 (ए), 125 (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. अपघात घडला त्यावेळी अल्पवयीन मुलाचा मित्रही त्या गाडीत होता. पोलिसांनी एसयूव्ही कार जप्त केली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group