तनुजा वाघ आणि वैष्णवी खलाणे यांची खेलो इंडिया वुमेन्स लीग राष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई
तनुजा वाघ आणि वैष्णवी खलाणे यांची खेलो इंडिया वुमेन्स लीग राष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई
img
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी )-खेलो इंडिया अंतर्गत घेण्यात येत असलेल्या वुमेन्स लीग राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत नाशिकच्या तनुजा वाघ आणि वैष्णवी खलाणे यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक प्राप्त केले.

केरळ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना तनुजा वाघ या नाशिकच्या महिला खेळाडूने ज्युनियर (15 ते 21 वयोगटात) 78 किलो खालील वजन गटात रौप्य पदक प्राप्त केले. आणखी एक दुसरी खेळाडू वैष्णवी खलाणे हिने 52 किलो खालील वजन गटात कॅडेट (15 ते 18 वयोगट) आणि ज्युनियर (15 ते 21 वयोगट) अशा दोन्ही गटात कांस्यपदक प्राप्त करत महाराष्ट्राला व नाशिकला पदक मिळवून दिले. या दोन्ही खेळाडूंचे नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group