नागपूरमध्ये रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे. शालिमार एक्स्प्रेसचे एस टू आणि पार्सलचे दोन डबे ट्रॅकवरून खाली उतरले आहे.नागपूरच्या कळमना रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. मुंबईहून निघालेली शालिमार एक्सप्रेस इतवारी रेल्वे स्थानकावर येताच अचानक रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आलं आहे.
दरम्यान , एक्सप्रेसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर रेल्वे प्रशासन काम सुरू आहे. या मार्गावरील काही गाड्या प्रभावीत झालेल्या आहे. तसंच काहींचे मार्ग बदलण्यात आले आहे. दुरुस्तीचं काम हे काम युद्धपातळीवर सुरू असून पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन ते तीन तासापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.