Nashik ACB TRAP : 500 रुपयांची लाच घेताना पोलीस नाईक जाळ्यात
Nashik ACB TRAP : 500 रुपयांची लाच घेताना पोलीस नाईक जाळ्यात
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- 500 रुपयांची लाच घेताना घोटी पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
विक्रांत चंद्रकांत झाल्टे (वय 39) असे लाच घेणाऱ्या पोलीस नाईकाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची पिकअप गाडी असून त्याद्वारे ते घोटी हद्दीत प्रवासी वाहतूक व माल वाहतूक करतात. 
ही गाडी प्रवासी व मालवाहतूक करून पट्ट्यावर चालू देण्यासाठी व या गाडीवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी झालटे यांनी पाचशे रुपयाची लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती मीरा आदमाने, पो. हवा.पंकज पळशीकर, पो.हवा.प्रमोद चव्हाणके, पो.हवा दीपक पवार, चालक पो.हवा. विनोद पवार यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group