नाशिक (प्रतिनिधी) :- येथील ऑलिम्पिकपटू सर्वेश कुशारे यांना नायब सुभेदार या पदावर बढती देण्यात आली आहे.
पॅरिस ऑलम्पिक मध्ये भारताकडून उंच उडी या खेळ प्रकारात सहभागी होणारा सर्वेश कुशारे आर्मी मध्ये नोकरीला आहे. यापूर्वी हवालदार या पदावर ते कार्यरत होते. मात्र ऑलिम्पिक मध्ये त्यांच्या सहभागामुळे त्यांना नायब सुभेदार या पदावर बढती देण्यात आली. आज पुणे येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ही बढती देण्यात आली.
यावेळी कर्नल देवराज गिल, लेफ्टनट कर्नल अनुपम सिंघ या दोघांनी प्रमोशन लावलं. सर्वेश यांना मिळालेल्या बढती बद्दल प्रशिक्षक रावसाहेब जाधव, टाकळी विंचुरचे क्रीडाप्रेमी ज्ञानेश्वर मोकाटे, सरपंच काळे ताई, पोलीस पाटील, विलास काळे, क्रीडाप्रेमी जितेंद्र आहिरे सर, मुख्याध्यापक लभडे सर, आदर्श ग्रुपचे विकास काळे, सर्वेशचे शिक्षक प्रा. सोपान पवार सर, प्रा. हरी बच्छाव सर, प्रा. संगमनेर जाधव मॅडम यांनी अभिनंदन केले.