अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासोबत पोर्नोग्राफी प्रकरणी तुरुंगात गेलेली अभिनेत्री गेहना वशिष्ठ पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. ईडीने अभिनेत्री गेहना वशिष्ठला समन्स पाठवले होते. त्यानुसार सोमवारी गेहना वशिष्ठ ईडीसमोर हजर झाली होती पॉर्नोग्राफी नेटवर्कशी जोडलेल्या मनी लॉड्रींग प्रकरणात गेल्या आठवड्यात गहना वशिष्ठ हिच्या घरी ईडीची धाड पडली होती. सोमवारी ही अभिनेत्री ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली. तेथे तिची ईडीकडून सात तास चौकशी झाली.
गहना हीचे नाव बऱ्याच काळापासून पॉर्नोग्राफी प्रकरणाशी जोडलेले गेले आहे. साल २०२१ साली पहिल्यांदा तिचे नाव या प्रकरणात समोर आले होते. गेल्या आठवड्यात तिच्या घरी छापे पडले होते. त्यात अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. आता या प्रकरणात तिची चौकीशी झाली आहे. तिला मंगळवार १० डिसेंबर रोजी पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात गहना हीचे सात बॅंक खाती फ्रीज करण्यात आली होती. तसेच त्यांचे दोन मोबाईल फोन आणि अनेक डॉक्युमेंट्स जप्त करण्यात आले होते. गहना हीच्या आधी राज कुंद्रा यांना देखील समन्स जारी करण्यात आले होते आणि त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात देखील आले होते. परंतू त्यांनी थोडा वेळ मागितला होता.जेव्हा पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा यांना अटक झाली होती. त्याच वेळी गहना या प्रकरणी वादात सापडली. त्याच वेळी तिच्या अडचणी वाढल्या होत्या.