
१७ फेब्रुवारी २०२५
परीक्षेला उशीर होईल म्हणून एका पठ्ठ्याने चक्क पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्र गाठल्याचा आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे.
सातारा जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमधील ही घटना आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे दिवस सुरू आहेत, त्यात वीकएंड मुळे पर्यटकांची गर्दी आहे. त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि परीक्षेला होत असलेला उशीर पाहून एका पठ्ठ्याने चक्क पॅराग्लायडींगने परीक्षा केंद्र गाठले.
घाटातून कारने प्रवास करायला वेळ लागेल म्हणून विद्यार्थ्याने हा निर्णय घेतला. सोशल मीडियावर सध्या या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून महाबळेश्वरमधील हॅरिसन फॉली पॉइंट येथून पसारनी घाट सेक्शन पर्यंत या विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंगाने प्रवास करत त्याने परीक्षा केंद्र गाठलं. परीक्षा देणारा हा विद्यार्थी बी.कॉम प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी असून तो हॅरिसन फॉली पॉइंटवर स्वत:चं ऊसाच्या रसाचं दुकान आणि ज्युस सेंटर चालवतो.
Copyright ©2025 Bhramar