मोठी बातमी ! अजित पवारांकडून छगन भुजबळ यांना  फोन,  नेमकं काय म्हणाले ?
मोठी बातमी ! अजित पवारांकडून छगन भुजबळ यांना फोन, नेमकं काय म्हणाले ?
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुती सरकार स्थापन  झाल्यापासून अनेक घडामोडींना वेग आला. तसेच मंत्रमंडळाचा विस्तार असो किंवा  पालकमंत्री पद असो  यावरून महायुती सरकारमध्ये अनेक नेत्यांनी नाराजीचा सूर धरला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ते नाराज झाले होते. यानंतर त्यांनी वेगळे होण्याचेही संकेत दिले होते. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज झाले होते. “मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय नि फेकलं काय… कोणाला काय फरक पडतो. आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, परंतु हा छगन भुजबळ संपला नाही. तुम्ही मंत्रिपदावरून मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावललं त्यांना विचारायला हवं”, असे छगन भुजबळ म्हणाले होते. यानंतर ते सातत्याने वेगळी भूमिका मांडताना दिसत आहे. यानंतर त्यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. आता मात्र थेट अजित पवारांनी त्यांची नाराजी दूर केली आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मंत्रिपदावरुन नाराजी दूर झाल्याबद्दल भाष्य केले. विशेष म्हणजे छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. “मला चार दिवसांपूर्वी अजित पवारांचा फोन आला होता. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली की त्यांनी उशिरा फोन केला म्हणून. त्यांनी आपण बसून बोलू असं म्हटलं आहे”, अशी माहिती छगन भुजबळांनी दिली. यामुळे आता छगन भुजबळांची नाराजी दूर झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group