मस्साजोगचे सरपंच संतोष दशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या हत्येची चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी यासाठी मंत्री धनजंय मुंडेच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून दबाव वाढत आहे. एवढच नाही तर काही दिवसापूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी देखील केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची मंत्रालयातील दालनात भेट घेतली होती. त्यानंतर आता अजित पवार अमित शाहांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारणातील घडामोडींचा वेग आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , अमित शाहांबरोबर अजित पवारांची जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दुसरे कारण म्हणजे सुनेत्रा पवार यांना लोकसभा सचिवालायाकडून जो शासकीय बंगला मिळाला आहे त्या घराची पाहणी करण्यासाठी आल्याची देखील चर्चा आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. अजित पवारांसोबत प्रफुल पटेल उपस्थित होते. अमित शाहांच्या भेटीच्या दोन- तीन शक्यता वर्तवण्यात येत आहे.