दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून अतिशय भीषण असे अपघात घडत असतात. काही अपघात तर मनात धडकी
भरणारे असतात . अशीच हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उभ्या असलेल्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरची जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 3 वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली आहे.
नाशिकमधील मालेगावमधून ही अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गांवर टेहरे फाट्याजवळ घडला असून ही चिमुकली जागेवर ठार झाली असून चिमुरडीचे आई-वडिल गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वामी खैरनार (वय 3 वर्ष) असं या चिमुकलय मुलीचं नाव आहे. तर रवींद्र खैरनार, वंदना खैरनार अशी जखमींची आहे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, रवींद्र खैरनार हे आपली पत्नी आणि मुलीसोबत दुचाकीवरून देवळा येथून मालेगावकडे जात होते. टेहरे फाट्याजवळ पोहोचले असता चहा पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करत होते. पण त्याचवेळी पाठीमागून आलेल्या डंपरने जोराची धडकी दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीला धक्का लागल्यामुळे तिघेही डंपरखाली सापडले. या अपघातात ३ वर्षांची स्वामी खैरनारचा जागीच मृत्यू झाला. चिमुरड्या स्वामीच्या चेहऱ्यावरून डंपरचं चाक गेलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.