धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याबाबत अजित पवारांचं मत काय ? ''ही''  माहिती समोर ?
धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याबाबत अजित पवारांचं मत काय ? ''ही'' माहिती समोर ?
img
दैनिक भ्रमर
बीड सरपंच हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव घेत आरोप केले आहेत. तसेच विरोधकांकडूनही धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.

बीड प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून  राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.  विरोधकांचं एक शिष्टमंडळ आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या भेटीसाठी गेलं. या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे धनंजय मुंडे यांच्याबाबत तक्रार करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.   विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मात्र आता राजकारणातील घडामोडीना वेग आला आहे . 

मंत्री धनंजय मुंडे हे आज दुपारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. यानंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर माध्यमांना फार प्रतिक्रिया न देता परत जाणं पसंत केलं. यानंतर आता अजित पवार धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणार का? याबाबतची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही, असं अजित पवार यांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणात एसआयटी चौकशी, न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत कारवाई नाही, असं अजित पवार यांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई नाही. तीनही चौकशींमध्ये जो दोषी असेल, त्यावर कारवाई करणार, अशी अजित पवार यांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा सध्या तरी राजीनामा घेतला जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group