एका सासूचा आपल्या जावयावर जीव जडला आणि या प्रेमसंबंधातून जन्म दिलेल्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे यानंतर फरार झालेल्या सासूची आई पोलीस स्टेशनला पोहोचली आणि तिने याप्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली. हे प्रकरण ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. मुलीच्या पतीसोबतच सासूने प्रेमसंबंध बनवले त्यानंतर सासू आणि जावई गावातून फरार झाले. सासू आणि जावयाची ही प्रेम कहाणी चर्चेचा विषय बनली आहे. भारत-पाकिस्तान बॉर्डरवरच्या बाडमेर जिल्ह्यातील बाखासर क्षेत्रात बोली गाव आहे, या गावातील ही घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेर जिल्ह्यातील बेडियाची रहिवासी समूचं लग्न बोली गावातल्या मिठारामसोबत झालं, यानंतर त्यांना एक मुलगी झाली पण मिठारामचं निधन झालं. समूच्या मुक-बधीर मुलीचं लग्न 4 वर्षांपूर्वी गुजरातच्या देतालमधल्या पवारामसोबत झालं. यानंतर पवाराम बोली गावातच घर जावई बनून राहायला लागला. सासरीच राहत असताना पवारामचा जीव सासू समू देवीवर जडला.
पवारामपासून समू देवीला दिवस गेले आणि तिने एका मुलाला जन्मही दिला, पण सासू आणि जावयाने या मुलाची हत्या केली. यानंतर सासू आणि जावई फरार झाले आहेत, या दोघांचाही शोध पोलीस घेत आहेत.