पुण्यातुन एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकरांच्या मामांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचे शेवाळवाडीतून अपहरण करण्यात आले होते. सतीश वाघ माॉर्निंग वॉकला निघालेले असताना चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केलं. त्यांचा मृतदेह उरूळी कांचनच्या घाटात सापडला असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
चारचाकी गाडीवरुन आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांना जबरदस्ती गाडीत टाकत त्यांचं अपहरण केलं होतं. संबंधित घटना ही पुण्यातील एका चौकात झाली होती. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली होती. या घटनेचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला होता. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती.
पहाटे साडे सहा वाजता सतीश वाघ यांचं अपहरण झाले. ओळखीच्या प्रत्यक्षदर्शीने घटनेची सातच्या सुमारास माहिती कुटुंबाला दिली. नातेवाईक , स्थानिक यांना सगळ्यांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांना साडेसात वाजता घटनेची माहिती हडपसर पोलिसांना कळविण्यात आली. हडपसर पोलिसांनी तात्काळ प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला .
साधारण साडे आठ वाजता गुन्हे शाखेला 9 वाजता टीम रवाना करण्याचे आदेश दिले.साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या 12 टीम्स ने प्रत्यक्षात शोधाशोध सुरू केली. सीसीटीव्ही आणि टॅावर लोकेशनच्या मदतीने 12 वाजता तपास सुरू केला. तीनच्या सुमारास पोलिस आयुक्त स्वतः हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाले.द रम्यान, शोध सुरू असताना सहा वाजेच्या सुमारास उरूळी कांचनच्या घाटात बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली . हडपसर पोलिस , गुन्हे शाखेचे पोलिस मृतदेह सापडलेल्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी हा मृतदेह सतीश वाघ यांचा असल्याची खात्री पटली.