काय ?? गर्भवती पत्नी एकटीच मॉर्निंग वॉकला गेली म्हणून पतीने दिला तलाक
काय ?? गर्भवती पत्नी एकटीच मॉर्निंग वॉकला गेली म्हणून पतीने दिला तलाक
img
दैनिक भ्रमर
एखाद्या विवाहित जोडप्या मध्ये कधीकधी असे काही घडते ज्यामुळे ते टोकाचे निर्णय घेतात आणि एकमेकांना घटस्फोट देतात. पण हे भांडणे अतिशय टोकाचे आणि गंभीर असतील तरच शक्यतो असे निर्णय घेतले जातात. परंतु काही लोक शुल्लक करणावरूनही  कोणतेही निर्णय घेतात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने चक्क पत्नी एकटीच  मॉर्निंग वॉकला गगेली म्हणून तिला तलाक दिला. हि धक्कादायक घटना ठाण्यातील आहे. 

 पत्नी एकटीच मॉर्निंग वॉकला गेल्याने पतीचा राग अनावर झाला. त्याने संतापाच्या भरात बायकोला तलाक, घटस्फोट दिला. त्याने याची माहिती पत्नीच्या वडिलांना फोनवर दिली. या तिहेरी तलाक प्रकरणात पत्नीने पतीच्या विरोधात मुस्लिम महिला कायदा कलम 4 प्रमाणे तिहेरी तलाकच्या कायद्याखाली  गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणात पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार. 27 जानेवारी 2024 रोजी कुर्ल्याच्या अलिखान याच्याशी महिलेचा विवाह झाला होता. ही महिला गर्भवती असल्यामुळे ती कुर्ल्यातून आपल्या आई-वडिलांच्या घरी मुंब्रा येथे राहत होती. 10 डिसेंबर 2024 रोजी अलिखान याने आपल्या पत्नीला फोन केला असता ती मॉर्निंग वॉकसाठी गेल्याचे समजले. यावर पतीने तिला परत कुर्ल्यात येण्यास सांगितले. मात्र, परिस्थितीमुळे ती येऊ शकत नसल्याचे सांगताच पतीने फोन ठेवला. महिला घरी पोहोचल्यावर अलिखानने पुन्हा फोन करून स्पीकर ऑन करण्यास सांगीतले. आणि तिच्या कुटुंबासमोर तीनदा तलाक दिला.

दरम्यान, या घटनेनंतर महिलेला आणि तिच्या कुटुंबाला धक्का बसला. त्यांनी 11 डिसेंबर 2024 रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलीसांनी पती अलिखान याच्याविरोधात ट्रिपल तलाक कायद्याखाली गुन्हा नोंदवला. प्रकरणात पोलीसांनी त्याला नोटीस बजावली आहे. तसेच मॉर्निंग वॉकच्या कारणामुळे तलाक दिला की यामागे काही वेगळे कारण आहे, हे तपासले जात आहे. तपास अधिकारी रविंद्र पाखरे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सात वर्षांपूर्वी, 22 ऑगस्ट 2017 रोजी तिहेरी तलाकवर निकाल दिला होता. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने तलाक असंवैधानिक असल्याचा निर्वाळा दिला आहे. याप्रकरणी सरकारला कायदा करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले होते. या निकालानंतर केंद्र सरकारने तीन तलाक, तिहेरी तलाक लिहून अथवा बोलून लग्न मोडल्यास गुन्हा दाखल करण्याविषयी कायदा केला होता. या कायद्यान्वये जास्तीत जास्त 3 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.



इतर बातम्या
Join Whatsapp Group