आधार कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी ! ''या'' तारखेनंतर आधार अपडेट साठी मोजावे लागतील पैसे
आधार कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी ! ''या'' तारखेनंतर आधार अपडेट साठी मोजावे लागतील पैसे
img
दैनिक भ्रमर
आजकाल सर्वच ठिकाणी वापरण्यात आधार कार्ड हे एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे. त्यामुळे सर्वच आधार कार्डधारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे.आधार कार्ड अपडेट करुन घेण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहे. नियमांनुसार, दर 10 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करावं लागतं. ज्या नागरिकांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलं होतं, ते आता मोफत अपडेट करु शकतात.  आधार कार्डधारकांना पुढील काही तासांत मोफत अपडेट करुन घेता येणार आहे. मात्र सरकारने सांगितलेल्या मुदतीनंतर आधार कार्डात अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे नंतर पैसे खर्च करायचे नसतील, तर आताच या संधीचा फायदा घ्या.

नियमांनुसार, दर 10 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करावं लागतं. ज्या नागरिकांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलं होतं, ते आता मोफत अपडेट करु शकतात. नावात आणि फोटोत बदलही मोफत करुन मिळणार आहे. यूआडीएने दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबरपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करुन घेता येणार आहे. मात्र त्यानंतर नियमांनुसार ठरलेली रक्कम द्यावी लागणार आहे.

तसेच , नागरिक ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने सोयीनुसार आधार कार्ड अपडेट करु शकतात. नागरिक, फोटो,पत्ता, नाव, लिंग, जन्मतारीख बदलू शकतात. तसेच मोबाईल नंबर आणि इमेल आयडीही अपडेट करु शकतात. आधार कार्डात तुम्हाला आवश्यक असलेले बदल घर बसल्या करु शकता. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊनही बदल करता येतील. मात्र आधार कार्डात बदल करून घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्र लागू शकतात. शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, पारपत्र आणि अन्य ओळखपत्रांची गरज लागू शकते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group