पती पत्नीचं नातं विश्वासाच प्रेमाचं असत, पती पत्नीला एकमेकांची सोबत सुरक्षित वाटते पण या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने त्याच्या पत्नीला एका पार्टीमध्ये बॉससोबत शारिरिक संबंध ठेवायला सांगितले, मात्र पत्नीने याला नकार दिला. त्यामुळे या इंजनिअरने पत्नीला तीन तिलाक दिला आहे, याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसंच पतीने पहिल्या पत्नीला देण्यासाठी आपल्या दुसऱ्या पत्नीला माहेरून 15 लाख रुपये आणायला सांगितले, मात्र तिने आणले नाही. यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीला तीन तलाक दिल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे.
याप्रकरणी पीडित पत्नीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी पती सोहेल शेखविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यानंतर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून कल्याणमध्ये राहतो. पत्नीचा नकार ऐकून सोहेल शेखने तिला घराबाहेर काढली, यानंतर महिला छत्रपती संभाजीनगरला गेली, यानंतर तिने छत्रपती संभाजीनगरमध्येच पतीविरोधात तक्रार दाखल केली, यानंतर ही तक्रार कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली.