पीएफ धारकांसाठी एक गुड न्यूज  !  ग्राहकांच्या सुविधेसाठी  ईपीएफओ घेणार ''हा'' निर्णय
पीएफ धारकांसाठी एक गुड न्यूज ! ग्राहकांच्या सुविधेसाठी ईपीएफओ घेणार ''हा'' निर्णय
img
दैनिक भ्रमर
पीएफ धारकांसाठी एक गुड न्यूज आहे. ग्राहकांना चांगल्या सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी  ईपीएफओकडून अनेकदा आवश्यक बदल करण्यात येत असतात. असाच एक महत्वपूर्ण बदल आता करण्यात आला आहे. ज्याचा जास्तीत जास्त आणि सोयीस्कर असा फायदा पीएफ  धारकांना होणार आहे. 

पीएफ खात्यातील रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढण्याचा पर्याय पीएफधारकांना मिळाला. मात्र हक्काच्या रक्कमेसाठी पीएफधारकांना जवळपास 20 दिवस प्रतिक्षा करावी लागते. आता ही प्रतिक्षा नाहीशी होणार आहे. आता नववर्षापासून पीएफ खात्यातील रक्कम एटीएमद्वारे काढता येऊ शकते. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमित्रा डावरा यांनी बुधवारी 11 डिसेंबरला याबाबतची माहिती दिली. कामगार मंत्रालयाकडून देशातील असंख्य कर्मचारी वर्गाला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आयटी यंत्रणेत आवश्यक बदल केले जात आहेत.

पीएफधारकांकडून करण्यात आलेला क्लेम लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच अनेक किचकट गोष्टी साध्या आणि सोप्या करण्याचा प्रयत्न आहे. आता पीएफधारक क्लेम केलेली रक्कम थेट एटीएममधून काढू शकतो. यामुळे या व्यवहारात आधीच्या प्रोसेसच्या तुलनेत मानवी हस्तक्षेप कमी होईन आणि सर्व सोप होईल”, असं सुमित्रा डावरा यांनी नमूद केलं.

तसेच , एटीएममधून तिच रक्कम काढता येईल, ज्यासाठी पीएफधारकाने क्लेम केला असेल. पीएफधारकांना खात्यातील सर्वच रक्कम काढता येत नाहीत. तसेच ठराविक रक्कम काढण्यासाठी अर्ज करावा लागतो. तसेच विशेष स्थितीतच (लग्न, घर आणि इतर) सर्व रक्कम काढता येते. पीएफधारक ईपीएफओ वेबसाईट आणि उमंग अ‍ॅपद्वारे रक्कम काढण्यासाठी अर्ज करु शकतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group