मनमाड : शहरातील विविध भागांमध्ये दोन दिवसात सहा दुचाकी पेटवण्यात आल्याची घटना समोर आली. सदरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याप्रकरणी मनमाड पोलिसांनी एका तरुणाला अटक देखील केली आहे.सदरील घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन दिवसांमध्ये शहरातील विवेकानंद नगरसह विविध भागात दारूच्या नशेमध्ये एका तरुणाने घराबाहेर उभे केलेल्या सहा मोटरसायकली पेटवून दिल्याने शहरात एकच खळबळ उडाली असताना मनमाड पोलिसांनी सदरील घटनेची माहिती मिळताच तपासाची चक्रे फिरवले. अवघ्या काही तासांमध्ये रोहित जगताप वय २४ नामक तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केले असता सदरील दुचाकी पेटवल्याची कबुली त्याने दिली.
सागर जगताप या तरुणावर मनमाड पोलीस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून मनमाड न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची कोठडी मनमाड न्यायालयाने सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.
दुचाकी किंवा चार चाकी वाहन पार्किंग योग्य ठिकाणी करावे तसेच शक्य असल्यास वैयक्तिक किंवा दोन-चार घरे मिळून कॉलनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत यामुळे पोलीस प्रशासनाला मदत होईल. काही अडचण आल्यास तत्काळ 112 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विजय करे,पोलिस निरीक्षक मनमाड यांनी केले आहे.