सतीश वाघ हत्या प्रकरण :  मृतदेहावर दांड्याने मारल्याचा खुणा, पोलिसांची माहिती
सतीश वाघ हत्या प्रकरण : मृतदेहावर दांड्याने मारल्याचा खुणा, पोलिसांची माहिती
img
दैनिक भ्रमर

पुण्यात विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी नव्या माहितीचा खुलासा केला आहे.  सतीश वाघ  यांचं आधी अपहरण आणि त्यानंतर हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. सतीश वाघ यांचा मृतदेह पुण्यातील शिंदवणे घाटात आढळून आला आहे.

या घटनेप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. पोलीस सर्व बाजूंनी या घटनेचा तपास करत आहेत. या दरम्यान पुण्याचे पोलीस उपायुक्त ए राजा यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. सतीश वाघ यांच्या शरीरावर दांड्याने मारल्याचा खुणा असून त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा अंदाज आहे. वाघ यांची सकाळीच हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली आहे.

सतीश वाघ यांचं आज सकाळी अपहरण झालं होतं. सतीश वाघ माॉर्निंग वॉकला निघालेले असताना चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केलं. दरम्यान, शोध सुरू असताना सहा वाजेच्या सुमारास उरूळी कांचनच्या घाटात  सतीश वाघ यांचा मृतदेह सापडल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली . 
इतर बातम्या
Join Whatsapp Group