राजकीय : सत्तास्थापनेआधी महायुतीतील आमदारांनी केली ''ही'' नवीन मागणी
राजकीय : सत्तास्थापनेआधी महायुतीतील आमदारांनी केली ''ही'' नवीन मागणी
img
दैनिक भ्रमर
उद्या म्हणजेच  ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. दरम्यान आता महायुतीत तीन पक्षांच्या नेत्यांवर पक्षांतर्गत मागणी समोर आली आहे. मंत्रिमंडळ शपथविधीत इतर कॅबिनेट मंत्री यांचा समावेश करावा. सध्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन पक्षातील मंत्रिपदासाठी इच्छुक यांच्यात नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांकडे अनेक आमदारांनी नवीनच मागणी केली आहे. गुरुवारी आझाद मैदानावर शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर होतोय, त्यामुळे किमान प्रत्येकी भाजपमधील १० तसंच शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातील प्रत्येकी ५-५ असे 20 लोकांचा शपथविधी मागणी केली जात आहे. शपथविधीत जास्त मंत्री शपथ व्हावे यासाठी आज रात्री महायुती नेत्यांत चर्चा करून भाजपा पक्ष श्रेष्ठीना विनंती करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group