राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांनी दिली ''ही'' महत्वाची माहिती
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांनी दिली ''ही'' महत्वाची माहिती
img
दैनिक भ्रमर
विधानसभेत महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर आत राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान,   
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याचपार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीबाबत काय निर्णय झाला याची माहिती दिली आहे. आत्मक्लेश उपोषण करणाऱ्या बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार बोलत  होते. 

मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी कधी होणार? असा प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी अंदाजे 5 तारखेला होईल, असे सांगितले. तसेच खातेवाटप कधी होईल, असा विचारल्यावर ते म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर खातेवाटपाचा संपूर्ण अधिकार त्यांचा असतो. ते खातेवाटप जाहीर करतील आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला पद दिलं जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री कोण होईल? असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, सध्या प्रचंड बहुमताचे महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आम्ही जे काही पाच वर्षांचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, त्याची अंमलबजावणी करण्याला प्राधान्यक्रम देणार आहोत. तसेच भाजपाचा मुख्यमंत्री होईल हा निर्णय झाला आहे. याशिवाय उरलेल्या दोन पक्षांचे दोन उपमुख्यमंत्री होतील हा निर्णय देखील झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group