
२६ मार्च २०२५
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बनसोडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी याबाबतची अधिकृत घोषणा करतील. विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजकुमार बडोले, संजय बनसोडे व अण्णा बनसोडे या नेत्यांची नावे चर्चेत होती.
मात्र, अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि यावेळी मंत्रीपदाची अपेक्षा असलेल्या अण्णा बनसोडे यांना अजितदादांनी उपाध्यक्षपदाची संधी दिली. उपाध्यक्षपदासाठी महायुतीकडून अण्णा बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता. तो सोमवारी दुपारी झालेल्या पडताळणीत वैध ठरला. त्यामुळे त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली आहे.
Copyright ©2025 Bhramar