"राजकीय ऑपरेशनसाठी जेव्हा रुग्ण मिळेल, तेव्हा तुम्हाला सांगू.." - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
img
Dipali Ghadwaje
शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला. त्यानंतर उदय सामंत यांनीही अशाच आशयाचे विधान केले. दोन्ही नेत्यांच्या विधानांनी राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले.

'तुम्ही म्हणालात की डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो. येणाऱ्या काळात काही ऑपरेशन करण्याचा मानस आहे का? कारण उदय सामंत म्हणाले की, उबाठा आणि काँग्रेस पुन्हा एकदा फुटणार आहे. त्यांचे प्रवेश तुमच्याकडे होत आहे. काही जण तुम्हाला भेटून गेले?', असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला होता.

यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "तुम्ही त्याचा अर्थ फक्त राजकीय का काढता? राजकीय ऑपरेशनसाठी जेव्हा रुग्ण मिळेल, तेव्हा तुम्हाला सांगू. तुम्हाला कल्पना देऊ", असे सांगत त्यांनी स्मितहास्य केले.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group