प्रॉपर्टी डिलर दाजीने प्रॉपर्टी दाखवण्याच्या बहाण्याने केले मेहुणीवर लैंगिक अत्याचार; नंतर बायको असूनही तिच्याशी कोर्ट मॅरेज केले
प्रॉपर्टी डिलर दाजीने प्रॉपर्टी दाखवण्याच्या बहाण्याने केले मेहुणीवर लैंगिक अत्याचार; नंतर बायको असूनही तिच्याशी कोर्ट मॅरेज केले
img
दैनिक भ्रमर
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मेहुणीशी प्रेमाचे नाटक करून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी देणार्‍या दाजीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ही 27 वर्षीय असून, राणेनगर येथे आई व वडील यांच्यासोबत राहते. पीडितेची मोठी बहीण (काल्पनिक नाव अनिता) हिचा विवाह सन 2016 मध्ये आरोपी दाजीशी झाला असून, ते लेखानगर येथे राहतात. सन 2022 मध्ये पीडितेचे दाजीने पीडितेची बहीण व आईवडिलांना प्रॉपर्टी खरेदी-विक्रीच्या ऑफिसमध्ये कामासाठी पाठविण्याविषयी सांगितले.

त्यानुसार पीडिता ही फेब्रुवारी 2022 पासून सी. बी. एस. जवळ असलेल्या कान्हेरेवाडीतील ऑफिसमध्ये मॅनेजर म्हणून काम करू लागली. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याने आरोपीला कामानिमित्त बाहेर जावे लागत असे. त्यावेळी तो पीडितेला सोबत घेऊन जात होता. दोघेही जास्त वेळ एकत्र राहत असल्याने दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली.

त्यानंतर आरोपीने पीडितेला “तू मला लहानपणापासून आवडत असून, मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे सांगितले. त्यानंतर दि. 12 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सापुतारा येथे प्रॉपर्टी पाहायची आहे, असे सांगून एमएच 15 डीसी 7141 या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने दोघेही सापुतारा येथे जाण्यासाठी निघाले.

आरोपीने नाशिकला परत येत असताना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गाडी मध्येच कुठे तरी थांबविली व प्रेमाचे नाटक करून त्याने पीडितेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. ही घटना घरी कोणालाही सांगू नकोस, असे सांगून पीडितेला घरी सोडले. त्या दिवसापासून पीडितेने दाजीला भेटायचे नाही, असे ठरविले. तरीही आरोपीने कारमध्ये तिच्यावर तीन वेळा लैंगिक अत्याचार केले.

सन 2023 मध्ये एके दिवशी रात्री 10 वाजेच्या सुमारास आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन तिला घराच्या पाठीमागे नेऊन गाडीत बसविले व तिला दमबाजी करून तिच्यावर गाडीतच अत्याचार केले. मे 2024 मध्ये आरोपीने पीडितेकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला, तसेच दोघांच्या नावाने कोर्टामध्ये रजिस्ट्रेशनदेखील केले. जून 2024 मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केले. दोघांचे लग्न होऊनही पीडिता ही वडिलांच्या घरी राहत होती. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये खूप भांडणे झाली. त्यानंतर पीडितेने लग्नाच्या बंधनातून मुक्त करण्याविषयी त्याला सांगितले; मात्र त्याने दमबाजी करीत टाळाटाळ केली.

दरम्यानच्या काळात पीडिता गर्भवती झाली. हे कळल्यानंतर आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या; मात्र या गोळ्या घेण्यास नकार दिला असता आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. एवढे होऊनही पीडितेच्या घरच्यांना तिच्या लग्नाविषयी माहिती नव्हती. उलट तिचे वडील तिच्यासाठी वर शोधत होते.

या काळात आरोपी व पीडितेमध्ये दुरावा निर्माण झाला. दरम्यान, दि. 26 नोव्हेंबर 2024 रोजी आरोपीने पीडितेला “तू माझ्याबरोबर आली नाहीस, तर आपल्या लग्नाचे फोटो तुझ्या नातेवाईकांना पाठवून तुझी बदनामी करीन,” अशी धमकी दिली. या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने अखेर इंदिरानगर पोलीस ठाण्यात पती तथा दाजीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group