नाशिक : आजपासून सिटी लिंकची
नाशिक : आजपासून सिटी लिंकची "या" नवीन मार्गावर बस सेवा; असा आहे मार्ग
img
दैनिक भ्रमर
 नाशिक:  नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. सिटीलिंकच्या वतीने २५० बसेसच्या माध्यमातून नाशिक शहर व शहर हद्दीपासून सुमारे २० कि.मी  पर्यंतच्या परिसरात विविध मार्गांवर सार्वजनिक बससेवा पुरविण्यात येते. आता सिटीलिंकच्या वतीने मार्ग क्रमांक ११८ नवीन सी.बी.एस ते त्रिवेणी हाईट्स / म्हाडा (आडगाव) या नवीन मार्गावर बससेवा सुरु करण्यात आली आहे.
 सदर परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी बससेवेची मागणी केल्यानंतर संपूर्ण सर्व्हे करण्यात आला आणि अखेर सिटीलिंक प्रशासनाच्यावतीने नागरिकांची गेल्या काही दिवसांची मागणी पूर्णत्वास नेण्यात आली आहे मुख्य म्हणजे आज सिटीलिंकच्या बसेस या नवीन मार्गावर धावतांना दिसून आल्या.
 
असा असेल हा नवीन मार्ग :– मार्ग क्रमांक ११८ नवीन सी.बी.एस ते त्रिवेणी हाईट्स / म्हाडा (आडगाव) मार्गे हिरावाडी, त्रिकोणी बंगला, साई शिव नगर, के.के वाघ ॲग्रीकल्चर महाविद्यालय, राऊत मळा मार्गे त्रिवेणी हाईट्स व त्याच मार्गाने पुन्हा बस माघारी येणार.

अश्या असणार बस फेऱ्यांच्या वेळा:-
तपोवन डेपो ते त्रिवेणी हाईट्स / म्हाडा (आडगाव)    :-  ०६:१० 
नवीन सी.बी.एस ते तपोवन      :-  २०:०० 
नवीन सी.बी.एस ते त्रिवेणी हाईट्स / म्हाडा (आडगाव)  :-  ०७:१५, ०८:४५, १०:३०, १२:००, १३:४५, १५:१५, १७:००, १८:३०
त्रिवेणी हाईट्स / म्हाडा (आडगाव) ते नवीन सी.बी.एस  :-  ०६:३०, ०८:००, ०९:३०, ११:१५, १२:४५, १४:३०,१६:००, १७:४५, १९:१५   

बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी पासून या नवीन मार्गावर सिटीलिंक बसेस सुरु करण्यात आल्या असून जास्तीत जास्त प्रवाशांनी या बस मार्गावरील बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्यावतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group