सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना न्यायालयाने समन्स बजावले आहे. नेम के काय कारण आहे आपण जाणून घेऊया.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्यावर आधारित चित्रपटाची कथा वादात सापडली आहे. याप्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना न्यायालयाने समन्स बजावले आहे. खाशाबा जाधव यांच्यावरील खाशाबा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांच्याकडून जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दिग्दर्शक नागराज मुंजळे यांच्यासह जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्याविरोधातही दावा दाखल करण्यात आला आहे. खाशाबा यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क २००१ पासून संजय दुधाणे यांच्याकडे असल्याची माहिती मिळतेय. तर चित्रपटाची निर्मिती, प्रदर्शन करण्यास मनाई आणि ठरावासाठी संजय दुधाणे यांच्याकडून अॅड. रविंद्र शिंदेंसह अॅड. सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे.