आजकाल फसवणुकीची प्रकरणं प्रचंड वाढली आहेत. लग्नाबाबतही असे अनेक प्रकार समोर येतात. एका नवरीसोबतही असाच प्रकारघडला आहे. साथीदारासोबत स्वप्न रंगवले होते तोच मोठा भामटा निघाला. ही धक्कादायक घटना गोरखपूर येथे घडली आहे. एका लग्नात पोलिसांनी मांडवाच्या मधोमध येऊन थेट नवरदेवालाच ताब्यात घेतलं.
या प्रकरणाविषयी अधिक माहिती अशी की , हा नवरदेव एका मुलीसोबत 7 वर्षे लिव्ह-इन रिलेशन मध्ये राहिला इतकंच नाहीतर त्यानं त्या मुलीसोबत एका मंदिरात लग्न केलं होतं. तिच्यासाठी घर घेतलं. अगदी नवरा-बायकोसारखा संसार सुरू होता. ती कायम त्याला आपण कुटुंबासोबत राहूया असं सांगायची, मात्र त्यासाठी तो तिला नकार द्यायचा. त्यानं कधीच तिला आपल्या कुटुंबियांना भेटवलं नाही किंवा घरी कोणालाही आपल्या लग्नाबाबत काही सांगितलं नाही. उलट कुटुंबियांच्या संमतीनं तो दुसरीकडे आपलं लग्न ठरवून मोकळा झाला.
दरम्यान, दुसऱ्या लग्नात त्याचं पहिलं नातं सगळ्यांसमोर उघड झालं. त्यावेळी त्याच्या पहिल्या बायकोनं सांगितलं की, ‘यानं मला तो दुसरं लग्न करतोय हे सांगितलं होतं आणि याविरोधात जर पोलिसात तक्रार केली तर जीवेमारण्याची धमकी दिली होती.’ दरम्यान, त्याच्या धमकीनं पहिली बायको घाबरली नाही. तर तिनं थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी भामट्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केलं. या सगळ्या प्रकारानंतर त्याचं दुसरं लग्न मोडलं. त्या तरुणीनं मला असल्या नराधमाशी लग्न करायचंच नाही, असं स्वत: सर्वांसमोर येऊन सांगितलं.