Election Commission च्या भरारी पथकाची मोठी कारवाई ;
Election Commission च्या भरारी पथकाची मोठी कारवाई ; "या" ठिकाणाहून तब्बल २ किलो सोनं जप्त
img
Dipali Ghadwaje
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आलीय. निवडणुकीच्या काळात पैशांचे मोठ्या प्रमाणात वाटप होत असते. मतदारांना आमिष दाखवण्यासाठी पैसे, दारू, सोने, चांदी किंवा अन्य मौल्यवान वस्तूंचे वाटप केले जाते. खरं तर हे रोखण्यासाठी आणि याला आळा घालण्यासाठी पोलीस तसेच भरारी पथक यांची करडी नजर यावर असते. राज्यात जेव्हापासून आचारसंहिता लागू झालीय, तेव्हापासून कोट्यवधी रुपये आणि मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. 

अशातच विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दहिसरमधून तब्बल २ किलो सोनं पोलिसांनी जप्त केलं आहे. दहिसर पश्चिम येथे स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमने १.४३ कोटी रुपयांचे सोनं जप्त केलं. या सोन्याचे वजन १.९५ किलो इतके आहे. हे सोनं कुठून आणले आणि कोणाकडून आणले याप्रकरणी दहिसर पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

दरम्यान याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पश्चिम येखील अवधूत नगर परिसरामध्ये पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. निवडणूक अधिकारी श्रीमती शीतल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित तपासणी दरम्यान यतीन धोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम क्रमांक ९ ने यशस्वीरित्या ही कारवाई करत सोनं जप्त केले.

१.९५ किलो वजनाचे हे सोनं असून त्याची अंदाजे किंमत १.४३ कोटी रुपये इतकी आहे. मौल्यवान धातू आणि बेहिशेबी रोकड यांची अनधिकृत हालचाल रोखण्याच्या उद्देशाने नियमित पाळत ठेवण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून ही जप्ती करण्यात आली. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group