जो पोलीस अधिकारी लॉरेन्स बिश्नोईचं एन्काऊंटर करेल त्याला
जो पोलीस अधिकारी लॉरेन्स बिश्नोईचं एन्काऊंटर करेल त्याला "इतक्या" कोटींचे बक्षीस ; "या" संघटनेची घोषणा
img
Dipali Ghadwaje
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये कैद असला तरी संपूर्ण देशभरातच त्याची प्रचंड चर्चा सुरू आहे. मोठे राजकारणी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर तर त्याच्या नावाची चर्चा थांबतच नाहीये. लॉरेन्सच्या शूटर्सनीच सिद्दीकी यांची हत्या केल्याचे सांगत या एका सोशल मीडिया पोस्टमधून या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती.

लॉरेन्स आणि अभिनेता सलमान खानचं वैर तर जगजाहीर आहे. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानलाही मोठा धक्का बसला असून त्याचा सुरक्षेत कैक पटीने वाढ करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सगळीकडे सध्या लॉरेन्सच्याच नावाची चर्चा होताना दिसत आहे.

याचदरम्यान आता क्षत्रिय करणी सेनेने लॉरेन्सविरोधात मोर्चा उघडला आहे. लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसाला 1 कोटीचं बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. क्षत्रिय करणी सेनेचे अध्यक्ष डॉ राज शेखावत यांनी ही घोषणा केली असून जो पोलीस अधिकारी लॉरेन्स बिश्नोईचं एन्काऊंटर करेल त्याला 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

एका दिवसापूर्वीच राज शेखावत यांनी बडोदा येथे लॉरेन्स बिश्नोईच्या मुद्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. सुखदेव सिंग गोगामेडी हत्या प्रकरणातही लॉरेन्सचे नाव समोर आले होते, असे शेखावत म्हणाले होते. , लॉरेन्स आणि त्यांच्यासारख्या गुंडांनी संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे शेखावत यांनी म्हटलं होतं.

काय म्हणाले राज शेखावत ?

क्षत्रिय करणी सेनेच राष्ट्रीय अध्यक्ष राज शेखावत यांनी एका व्हिडीओद्वारे बिश्नोईच्या एन्काऊंटरवर बक्षिसाची घोषणा केली होती. लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपये दिले जातील. शहीद सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या लॉरेन्स बिश्नोईद्वारे करण्यात आली होती. जो पोलीस अधिकारी लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करेल त्याला करणी सेना ही 1 कोटींची रक्कम देईल, असे राज शेखावत यांनी या व्हिडीमध्ये नमूद केले. एवढेच नव्हे तर त्या शूर पोलिसाच्या कुटुंबाची सुरक्षा आणि संपूर्ण व्यवस्था करणे ही आमची जबाबदारी असेल, असेही त्यांनी नमूद केले. 

दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आता क्षत्रिय करणी सेनेने लॉरेन्स बिश्नोई विरोधात उडी घेतली असून नवे गँगर भडकण्याची शक्यता आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group