बापाच्या नात्याला काळिमा ! दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार
बापाच्या नात्याला काळिमा ! दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार
img
दैनिक भ्रमर

देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. दरदिवशी महिला अत्याचाराच्या घटनेत चिंताजनाज  वाढ  होत आहे. अल्पवयीन मुली असो किंवा प्रौढ महिला असो कोणत्याही वयाची स्त्री सुरक्षित नाही. कामाचे ठिकण असो किंवा घर, त्या कुठेही सुरक्षित नाही. दरम्यान, अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.  बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सावत्र पित्याने त्याच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुलींच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यावर पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात बलात्काराची धक्कादायक घटना घडली. दोन अल्पवयीन मुलींवर त्यांच्या सावत्र वडिलांनी बलात्कार केल्याचं उघडकीस आलं आहे. घटनेची माहिती मिळताच आरोपीच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुलींच्या सावत्र वडिलांना अटक केली आहे.

 सहायक पोलीस आयुक्त (कविनगर) अभिषेक श्रीवास्तव यांनी सांगितलं, की ‘भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि पोक्सो कायद्यातल्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आरोपीशी विवाह केला होता.’

गाझियाबादमधल्या कविनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत आरोपीची पत्नी म्हणजेच पीडित अल्पवयीन मुलींच्या आईने सांगितलं, ‘‘मला पूर्वीच्या पतीपासून दोन मुली आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून माझा पती या दोन्ही अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करत होता. बुधवारी मी पतीला माझ्या 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करताना पकडलं.’ त्यानंतर 16 वर्षांच्या थोरल्या मुलीनेही सांगितलं, की तिच्यावर सावत्र वडील गेल्या काही महिन्यांपासून अनेकदा बलात्कार करत आहेत. 

दरम्यान , याबाबत सहायक पोलीस आयुक्त अभिषेक श्रीवास्तव यांनी सांगितलं, की ‘या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आरोपीने दिल्याचं दोन्ही मुलींनी आईला सांगितलं. पतीला त्याच्या आईने म्हणजे आपल्या सासूने मदत केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.’
इतर बातम्या
Join Whatsapp Group