त्याच्यासाठी करवा चौथचा उपास केला अन् त्याच दिवशी तिने त्याचा जीव घेतला ! काय आहे प्रकरण ?
त्याच्यासाठी करवा चौथचा उपास केला अन् त्याच दिवशी तिने त्याचा जीव घेतला ! काय आहे प्रकरण ?
img
दैनिक भ्रमर
प्रत्येक पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुषा साठी मनोभावे कारवाचौथ चा व्रत करत असते. पण याच कारवाचौथ च्या दिवशी एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करवा चौथचा च्या  दिवशी उत्तर प्रदेशातील कौशंबी येथे  हे धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले. तेथे एका महिलेने पतीच्या दीर्घायुष्याची कामना करत दिवसभर त्याच्यासाठी करवा चौथचा उपास केला. मात्र संध्याकाळी तिने त्याच पतील अन्नातून विष देऊन त्याची हत्या केली. मॅक्रोनीमधून विष देऊन तिने त्याला खाऊ घातलं. ते खाताच त्याची तब्येत बिघडली, ते पाहून त्याची पत्नी तेथून लागलीच फरार झाली. कुटुंबियांनी त्या इसमाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, त्याची प्रकृती गंभीर होती. मात्र तेथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश (य 32) असं मृताचं नाव असून तो इस्माइलपूर गावचा रहिवासी होता. त्याच्यात व पत्नीत नेहमी वाद व्हायचे, तिच्या चुकांमुळे तो नेहमी नाराज असायचा, सतत वाद व्हायचे अशी माहिती कुटुंबातील इतर सदस्यांनी दिली. रविवारी दुपारी, करवा चौथच्या दिवशीही त्यांच्यात मोठा वाद झाला. त्यानंतरच त्याच्या पत्नीने, सविताने त्याला मॅक्रोनीमधून विष दिलं असा आरोप आहे. ती मॅक्रोनी खाताच शैलेशची तब्येत अचानक बिघडली. ते पाहून सविता पतील तसंच सोडून तिथून लागलीच फरार झाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे असे सीओ अवधेश विश्वकर्मा यांनी सांगितले.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group