शिंदे गटाच्या उमेदवारावर गोळीबार
शिंदे गटाच्या उमेदवारावर गोळीबार
img
DB
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यात सर्वत्र मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. त्याचदरम्या, राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे गाडीवर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकासमोर आला आहे. या घटनेनं नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर हा सगळा प्रकार घडला आहे.

मतदारांच्या भेटीगाठी घेऊन परतत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर ५ गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांचा निशाणा चुकल्याने भाऊसाहेब कांबळे सुदैवाने बचावले आहेत. रात्री दीड वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात आरोपींविरोधात श्रीरामपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group