राज्यात सध्या महिला सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, दर दिवशी नवीन घटना समोर येत आहेत. म्हणून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, जालना शहरात ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलीला अंमली पदार्थ देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर आरोपींनी तिला रस्त्यावर फेकून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिला जालना जिल्हा रुग्णालयातून संभाजीनगर वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चंदनझिरा परिसरात ही घटना घडली. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून तिला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, या घटनेत एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. प्राथमिक पुराव्यांनुसार पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान , दोषींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलगी एकटी असताना तिला घरातून उचलून नेले आणि तिला अंमली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला. तिच्यावर अत्याचार करून तिला रस्त्यावर सोडून फेकून दिले.