नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कंपनीतील दोन महिलांना व्हॉट्सअॅपद्वारे अश्लील मजकूर पाठवून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी कंपनीमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पीडित महिला ही अंबड एमआयडीसीतील रिलाएबल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. या कंपनीत दि. 21 सप्टेंबर रोजी होती.
त्यावेळी आरोपी कंपनीमालक किशोर अशोकराव साळुंके याने त्याच्या मेलवरून फिर्यादी पीडितेच्या मेलवर अश्लील भाषेतील अनेक मेल, तसेच त्याच्या मोबाईल क्रमांकावर पीडितेच्या व्हॉट्सअॅपद्वारे तिच्या वैयक्तिक व खासगी करिअरबाबत अश्लील मजकूर पाठविला. तसेच भारतात आल्यानंतर तुला दाखवितो, अशी धमकी दिली, तसेच फिर्यादीसह तिच्या सहकारी महिलेच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.